Tips To Grow Your Social Media Follower Base Without Winking Like Priya Varrier
काही महिन्यांपूर्वी प्रिया वॅरियर या अभिनेत्री चा विडिओ इंटरनेट वर खूप वायरल झाला होता. तुम्हालाही आठवत असेल. तिला केवळ ३ दिवसात ३० लाख फॉलोवर्स मिळाले. गमतीदार आहे, नाही ? जिथे मोठमोठ्या कंपन्या हजारोंनी पैसे खर्च करतात त्यांचे कन्टेन्ट वायरल करायला, तिथे हि मुलगी डोळा मिचकावुन तब्बल ३० लाख फॉलोवर्स मिळवते, आणि तेही फक्त ३ दिवसात. याला काय म्हणाल ? खरं म्हणजे प्रसिद्धीचा असा कुठलाही फिक्स फॉर्मुला नाही आणि नसतो. आता जरी आपल्याला प्रिया वॅरियर सारखा रातोरात सोशल मीडिया सेलेब्रिटी नाही बनता आलं तरी आपण नित्यनेमाने खाली दिलेल्या टिप्स च्या आधारे फेसबुक, इंस्टाग्राम इ वर आपले फॉलोवर्स वाढवु शकतो. गरज आहे थोडा वेळ देण्याची आणि दर्जेदार कन्टेन्टची. मग हे कसं साध्य करायचं ? ( टीप नं ६ आणि नं ७ महत्वाचे आहेत ) सुरु करण्यापुर्वी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि प्रत्येक ऍड व मार्केटिंग प्लॅटफॉर्म हे थोडे वेगवेगळे असतात. त्यामुळे एकच कन्टेन्ट सगळीकडे वापरुन फायदा होत नाही. लोकं मुख्यतः हीच एक चुक करतांना मी पाहिलंय. ज्यांना खरंच सोशल मीडिया आपल्याला फायदा देऊ शकतो असं वाटतं, ...