Tips To Grow Your Social Media Follower Base Without Winking Like Priya Varrier



काही महिन्यांपूर्वी प्रिया वॅरियर या अभिनेत्री चा विडिओ इंटरनेट वर खूप वायरल झाला होता. तुम्हालाही आठवत असेल. तिला केवळ ३ दिवसात ३० लाख फॉलोवर्स मिळाले. गमतीदार आहे, नाही ?
जिथे मोठमोठ्या कंपन्या हजारोंनी पैसे खर्च करतात त्यांचे कन्टेन्ट वायरल करायला, तिथे हि मुलगी डोळा मिचकावुन तब्बल ३० लाख फॉलोवर्स मिळवते, आणि तेही फक्त ३ दिवसात. याला काय म्हणाल ?
खरं म्हणजे प्रसिद्धीचा असा कुठलाही फिक्स फॉर्मुला नाही आणि नसतो.
आता जरी आपल्याला प्रिया वॅरियर सारखा रातोरात सोशल मीडिया सेलेब्रिटी नाही बनता आलं तरी आपण नित्यनेमाने खाली दिलेल्या टिप्स च्या आधारे फेसबुक, इंस्टाग्राम इ वर आपले फॉलोवर्स वाढवु शकतो. गरज आहे थोडा वेळ देण्याची आणि दर्जेदार कन्टेन्टची.
मग हे कसं साध्य करायचं ?
( टीप नं ६ आणि नं ७ महत्वाचे आहेत )
सुरु करण्यापुर्वी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि प्रत्येक ऍड व मार्केटिंग प्लॅटफॉर्म हे थोडे वेगवेगळे असतात. त्यामुळे एकच कन्टेन्ट सगळीकडे वापरुन फायदा होत नाही. लोकं मुख्यतः हीच एक चुक करतांना मी पाहिलंय. ज्यांना खरंच सोशल मीडिया आपल्याला फायदा देऊ शकतो असं वाटतं, त्यांनी जरुर या टिप्सचा फायदा करून घ्यावा.
चला सुरू करू -
  1. काय साध्य करायचं आहे, हे ठरवा
तुमच्या बिझिनेस पेज मधल्या डिस्क्रिप्शन मधुन लोकांना कळू द्या कि त्यांनी तुम्हाला "का फॉलो करावं". जर लोकांचा इंटरेस्ट तुमच्या कन्टेन्ट शी मॅच झाला, तर ते तुम्हाला फॉलो करण्याचे चान्सेस वाढतात.
2. आकर्षित करणाऱ्या इमेजेस टाका


यासाठी Snappa, Typorama, QUIK सारख्या टुल्सचा तुम्ही वापर करू शकता, यामुळे तुमची पोस्ट प्रोफेशनल वाटते आणि अश्या पोस्ट्स लोकांना आवडतात. उदाहरणासाठी एक इमेज येथे देत आहे. या फोटोला १३०००च्या जवळपास लाईक्स मिळाल्या होत्या.
3 हॅशटॅग्स आणि संबंधित (relevant ) लोकांना फॉलो करा
संबंधित (relevant) हॅशटॅग्सचा वापर करून संबंधित (relevant) लोकांना सर्च करा. असे लोकं पटकन फॉलो करायला लागतात, कारण ते तुमच्या इंडस्ट्रीशी संबंधित असतात.
4 वेळापत्रकाप्रमाणे सोशल मीडियावर पोस्ट्स टाका
जर तुम्ही रोज एका विशिष्ट वेळी पोस्ट टाकायचं ठरवलं असेल, तर ती वेळ मिस करू नका किंवा जर आठवड्यातून ३ वेळा पोस्ट टाकायची ठरवली असेल तरी चालेल पण ती ठरवलेल्या त्या-त्या वेळीच टाका. या मुळे हळुहळु तुमचा ऑडियन्स तयार व्हायला मदत होते. आणि हो, सब्जेक्ट मध्ये संबंधित हॅशटॅगचा वापर करा.
5 लोकांच्या कंमेंट्सना, रिस्पॉन्सेसना तुम्ही रिस्पॉन्ड करा
आता तुम्ही म्हणाल आम्ही करतो ! पण काय होतं, सुरुवातीचे काही दिवस रिस्पॉन्ड केल्यानंतर तुमचं पुढे लोकांशी एंगेज होणे, रिस्पॉन्ड करणे बंद होते, काही न काही कारणाने, अगदी जेनुइन कारण का असेना.
पण एक लक्षात घ्या कि सोशल मीडिया हि काही जादूची कांडी नाही. तुमच्या पोस्टला जे लोकं रिस्पॉन्स देत आहेत ते लोकं कदाचित तुमचे संभाव्य ग्राहक असू शकतात.
तुमचं तुमच्या संभाव्य कस्टमर्सशी संवाद, त्याला एंगेज करणं, रिस्पॉन्स खुप महत्वाचा आहे. या नुसत्या टिप्स नाही आहेत, हे अनुभव आहेत. सगळ्या यशस्वी लोकांचे, ज्यांनी सोशल मीडिया चा नीट समजुन वापर केला स्वतःचा ब्रँड बनवण्यासाठी
6 कॅम्पेन्स चालवा, ज्यामुळे अधिक लोकं जोडल्या जातील
सोशल मीडिया वरच्या तुमच्या फॉलोवर्सनी अजुन लोकांना तुमच्या सोबत जोडावं असं वाटत असेल तर कॅम्पेन्स चालवा, फेसबुक इव्हेंट प्रोमोट करा, इतर लोकांना टॅग व शेअर करायला सांगा. त्यासाठी वेगळं कन्टेन्ट प्लॅन करा.
फॉलोवर्स वाढवण्यासाठी वेगवेगळे कन्टेन्ट आवश्यक आहे. एकच-एक मॅटरकडे लोकं लक्ष देत नाहीत.
7. स्टोरीज टाका आणि कंसिस्टन्ट रहा
आजकाल सोशल मीडिया ऑडियन्स ला स्टोरीज आवडतात, तेही शॉर्ट अँड स्वीट. तुमच्या कन्टेन्ट ला स्टोरीचं रुप-स्वरूप कसं द्यायचं याचा विचार करा. लोकांना कसं आवडेल याचा विचार करा. आणि मग तुमच्या ठरलेल्या शेड्युल प्रमाणे पोस्ट करत रहा.
हळुहळु तुमच्या लक्षात येईल कि तुमच्या पोस्टचा रिच (reach) वाढतो आहे, आणि नंतर नंतर फॉलोवर्स हि वाढू लागले आहेत. ही पद्धत यशस्वीरीत्या अनेकांनी केली आहे. नुसतं 'पोस्टर किंवा बॅनर' पोस्ट करून काहीही होत नाही. सोशल मीडियावर लाईक्स, फॉलोवर्स वाढवण्यासाठी स्टोरीज बनवणे ज्यामुळे लोकांची क्युरिऑसिटी जागृत होईल. हीच योग्य पद्धत आहे.
म्हणून सुरुवातीलाच मी म्हंटलं आहे, की प्रत्येक प्रसार माध्यमाची, त्याची एक वेगळी पद्धत, खासियत असते, त्याप्रमाणे समजुन तुम्ही काम केलं , तर तुम्हाला रिझल्ट्स मिळु शकतात.
मी वर उल्लेख केलेल्या टिप्सचा वापर करून पाहिल्यास तुमचे फॉलोवर्स वाढण्यात मदत होईल.
- Team Multiplyr
--------------------------------------------------------------------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

Google Launching A New Advertising Tool For Small Businesses

How To Register Your Business On Google For Free & Without a Website