How To Register Your Business On Google For Free & Without a Website
गुगलवर आपला व्यवसाय कसा रजिस्टर करायचा, आणि ते ही फ्री व वेबसाईट नसतांना
जेव्हा तुमच्या शहरातले लोकं तुमच्या व्यवसायाशी संबंधित शब्द गुगलवर ‘सर्च’ करतात तेव्हा तुमच्या व्यवसायाचं नाव,
विशेषता, प्रॉडक्ट्स, सर्व्हिसेस लोकांना कळावे असे तुम्हाला वाटत असेल. हो ना ?
याठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, आणि ती म्हणजे, जेव्हा लोकं काही विशिष्ट वस्तुचा गुगल वर शोध घेतात,
तेव्हा ते 'ती वस्तु' खरेदी करण्याचे चान्सेस खुप असतात. अश्यावेळी तुम्ही गुगलवर आपला व्यवसाय रजिस्टर केला नसेल
तर, लोकांना तुम्ही गुगल सर्च मधे दिसणारच नाही. हि बाब परवडण्यासारखी आहे का ते तुम्ही ठरवा.
फॉरच्युनेटली गुगलवर आपला व्यवसाय रजिस्टर करणं आता शक्य झालं आहे. यासाठी Google MyBusiness चा
उपयोग तुम्ही करू शकता. आणि रजिस्टर करण्यासाठी कुठलाही खर्च लागत नाही, तसेच त्यासाठी तुमची स्वतःची
वेबसाईट नसेल तरीही तुम्हाला तुमचा व्यवसाय रजिस्टर करता येतो. गुगल तुमच्या व्यवसायाचे नाव, पत्ता, फोन नं इ
सर्च करणाऱ्याला दाखवतं.
गुगल लिस्टिंग द्वारे तुमच्या ग्राहकांना आकर्षित करा
तुमचा संभाव्य ग्राहक जेव्हा तुमच्या व्यवसायाशी संबंधित शब्द (keywords) किंवा तुमच्या व्यवसायाचे नाव गुगलमधे
शोधतो, तेव्हा इतर संबंधित व्यवसायांसोबत तुमचेही नाव लिस्टिंगमध्ये दिसते. या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्यास गुगल मॅप्स
मध्ये देखील तुमच्या व्यवसायाचे लिस्टिंग झालेले दिसेल.
जर तुम्हाला काही बदल, नवीन माहिती टाकायची असेल तर ती हि अगदी सहजरित्या इथे करता येते
फ्रि वेबसाईट बनवता येते
इथे तुम्हाला एक फ्रि वेबसाईट सुध्दा बनवता येते, अर्थात ही फ्री असल्यामुळे प्रोफेशनल वाटत नाही.
तुम्हाला त्यात मॅटर, फोटो, व्हिडीओ, डिझाईन थिम्स टाकता येतात.
चला आता गुगल लिस्टिंग कसं करायचं ते पाहु -
स्टेप १ - तुमच्या व्यवसायाचा, किंवा व्यक्तिगत Gmail ID नी लॉग इन करा
स्टेप २ -
www.google.com/mybusiness ला क्लिक करा आणि उजव्या बाजुला असलेल्या "Start Now"
ला सिलेक्ट करा.
स्टेप ३ - तुमच्या व्यवसायाचे नाव टाईप करा
स्टेप ४ - तुमच्या व्यवसायाचा पत्ता टाईप करा
स्टेप ५ - खालीलपैकी एक पर्याय निवडा
(i) “I deliver goods and services to my customers.”
OR
(ii) “Hide my address (it's not a store) Only show region.”
स्टेप ६ - तुमच्या व्यवसायाचा प्रकार सिलेक्ट करा. उपलब्ध पर्यायांपैकी एक सिलेक्ट करा - जेणे करून गुगल ला कळेल
की कोणत्याप्रकारच्या ग्राहकानीं तुमचा व्यवसाय लिस्टिंग मधे पाहावा.
स्टेप ७ - तुमचा फोन नं आणि वेबसाईट असेल तर तोही टाईप करावा.
स्टेप ८ - आता तुम्हाला हवं ते
verification option निवडा
झालं !
आता वेरफिक्शन पूर्ण झाल्यावर
dashboard मधे जाऊन तुम्हाला उर्वरित माहिती भरता येईल. फोटो, व्हिडीओ
असतील तर जरूर टाकावे त्याने ऑप्टीमायझेशन साठी चांगला फायदा होतो.
जर या स्टेप्स प्रमाणे तुम्ही माहिती भरली , तर १० मिनिटात तुम्ही स्वतः तुमचे लिस्टिंग करू शकता.
तुमचा फोन नं आणि वेबसाईट असेल तर तोही टाईप करावा.
-Team Multiplyr
Comments