सोशल मीडिया कस्टमर केयर सुरु करा आणि तुमच्या ब्रॅण्डची ग्राहक निष्ठा वाढवा
ग्राहक सेवा किंवा ग्राहक मदती साठी सोशल मीडियाचा कसा उपयोग करावा तुमचे ग्राहक, क्लायंट्स सोशल मीडिया वापरतात का ? तुम्हाला त्यांना दर्जेदार सेवा द्यायची आहे का ? ‘सोशल मीडियाचा’ ग्राहक सेवेसाठी सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. कारण तुमचे जुने, आत्ताचे आणि संभाव्य ग्राहक, हे सगळेच सोशल मीडियावर असतील. आणि याद्वारे ही तुम्हाला ग्राहकांच्या संपर्कात राहता येईल. गेल्या ५ वर्षात झालेला एक फरक तुम्ही पाहिला असेल की पूर्वीसारखं आता सोशल मीडिया हे काही "ऑप्शन" राहिलेलं नाही, या उलट आता "गरज" म्हणुन त्याचा जास्त फायदा होतो आहे. व्यावसायिक मंडळी प्रमोशन, व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा उपयोग करतांना दिसतात देखील, पण आपण ग्राहक सेवेसाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो हे विसरून जाऊ नये. मागच्या वर्षी मार्च महिन्यात एक छोटासा सर्वे करण्यात आला होता, भारतातल्या निवडक शहरामध्ये १०००० सोशल मीडिया युझर्सला विचारण्यात आलं की - त्यांना सोशल मीडिया कडुन काय अपेक्षा आहे. त्यापैकी ९०% लोकांनी सांगितलं, की जर बिझिनेसेस सोशल मीडियावर असतील तर त्य